Friday, 17 June 2016

तारखेडे

भाऊसाहेब बा.ओं.पाटील माध्यमिक विद्यालय  तारखेडे ता.पाचोरा जि.जळगाव

श्री.के.आर.चौधरी (मुख्याध्यापक)

मो.नं.९४२३९७८२३८

श्री.एन.वाय.पाटील  (व.शिक्षक)

मो.नं.९८५०५०२४३४  


           




        

    विद्यालयाच्या कर्मचारीवृंदाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.

                                   पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील एक नामांकित व विविध उपक्रम राबविणारी शाळा म्हणजे तारखेडा येथील विद्यालय.या विद्यालयाची इमारत प्रशस्त व शाळेचा परिसर सुंदर आहे.वृक्ष फुल  झाडांनी सागाच्या वृक्षांनी बहरलेली बाग येणाऱ्यांचेमन मोहून टाकते .विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक वृंद नेहमी झटतअसतात व नवनवीन उपक्रम राबवितात .MTS,NTS,NAVODAYA,SCOLLERSHIP,DRAWING GRADEEXAM,SPORTS, या व या सारख्या अनेक बाह्य परीक्षांना विध्यार्थ्यांना बसवून त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल असे उपक्रम सातत्याने राबविले जातात.


      विद्यालयात नव्याने दाखल झालेल्या व वाचता-लिहिता न येणाऱ्या विद्यार्थ्यांची वैयक्तिक दखल घेऊन,जादातासांचे नियोजन करून “लेखन-वाचन” उपक्रमांतर्गत त्यांची तयारी केली जाते.

                                                                       लेखन-वाचन उपक्रम राबवितांना 

         विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी शुद्धलेखन देऊन आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी नोंदवहीत पालकांच्या स्वाक्षरी सह पडताळणी केली जाते.

         “शिक्षक-पालक” योजने अंतर्गत इयत्ता-१० वी च्या विद्यार्थ्यांची गट निहाय विभागणी करून गटानुसार त्यांची अभ्यासाची तयारी केली जाते.

आजचा विदयार्थी उदयाचा देशाचा नागरिक आहे. त्याला जर या वेगाने पसरणा-या जीवनाच्या प्रत्येक प्रसंगाला गरज बनू पाहणा-या माहिती तंञज्ञानाच्या साधनांची ओळख नसेल तर तो या माहिती तंञज्ञानाच्या प्रगतीत टिकणार नाही म्हणून या विदयार्थ्यांना या तंञज्ञानाचा अविष्कार त्यांच्या डोळयासमोर असावा तसेच या तंञज्ञानाचा अध्ययन-अध्यापनात समावेश करुन घेवून ही प्रक्रिया जीवंत बनवावी. या उद्देशाने १० संगणक असलेली अत्याधुनिक संगणक प्रयोग शाळा कार्यरत आहे.






  “संगणकावर प्रात्यक्षिक करतांना शाळेतील विद्यार्थी.”  

सूर्य, ग्रह,तारे, परिवलन, परिभ्रमन , ऐतिहासिक किल्ले, लेणी, नाणे,ताम्रपट , हदय, रक्तवाहिन्या, रोगजंतू, कवितांच्या चाली,संभाषण, प्राण्यांचे आवाज, गणिती आकत्या , क्षेञफळ, घनफळ संबोध, तसेच इतर सहशालेय माहितीचा खजिना या ग्रामीण भागातील विदयार्थ्यांच्या समोर ठेवावा, त्यांनीही शहरी भागातील शाळेप्रमाणे सर्व सुविधायुक्त शिक्षण घ्यावे , अध्ययन-अध्यापनातून अनेक संबोध चिरकाल त्यांच्या स्मरणात राहावेत अस तंञज्ञान शाळेत आणण्याचा शाळेचा मानस आहे.



 “शिवाजी दलित वसतिगृह तारखेडा”

“वसतिगृहातील कर्मचारी व विद्यार्थी”


शाळेतील वसतिगृहात विद्यार्थ्यांना ज्ञानदानासोबत अन्नदानाचे हि मौलिक कार्य केले जाते .वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी शालेय परिसरातच श्रमदानातून सेंद्रिय पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या फळ व पालेभाज्या पिकविल्या जातात. 

धन्यवाद.


No comments:

Post a Comment